कॅन्सरच्या उपचारासाठी संजय दत्त कोकिलाबेन रुग्णालयात; फॅन्सना प्रार्थना करण्याचं आवाहन
सध्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाने संजय दत्तच्या उपचाराबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. (Photo Credit: Manav Manglani)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरंतु, या रविवारी लीलावती रुग्णालयात संजय दत्त यांच्यावर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितलं की, संजय सध्या परदेशात न जाता मुंबईतच उपचार घेऊ शकतो. (Photo Credit: Manav Manglani)
असंही सांगण्यात येत होतं की, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असल्यामुळे अमेरिकेचा व्हिजा मिळाला नाही, तर संजय दत्त सिंगापूरला उपचारासाठी जाऊ शकतो. (Photo Credit: Manav Manglani)
दरम्यान, संजय दत्त आपल्या उपचारासाठी अमेरिकेत जाणार अशी चर्चा होताना दिसत होती. (Photo Credit: Manav Manglani)
त्यावेळी संजय दत्तने तिकडे असलेल्या फोटोग्राफर्सना विक्टरी साइन दाखवत माझ्यासाठी प्रार्थना करा, असं सांगितलं. (Photo Credit: Manav Manglani)
दरम्यान, मंगळवारील संध्याकाळी 7 वाजता संजय दत्त वांद्रे येथील इम्पीरियल हाइट बिल्डिंगमधून रुग्णालयात दाखल होण्यासाठी खाली उतरला त्यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी मान्यता दत्त, त्याची बहिण प्रिया दत्त, नम्रता दत्त दिसून आल्या. (Photo Credit: Manav Manglani)
संध्याकाळी 5 वाजून 15 मिनिटांनी संजय दत्त लीलावती रुग्णालयातून आपल्या घरी रवाना झाला. (Photo Credit: Manav Manglani)
संजय दत्त या शनिवारी म्हणजेच, 15 ऑगस्ट रोजी टेस्ट करण्यासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात गेला होता. त्यानंतर एका दिवसाने म्हणजेच, रविवारी संजय दत्तला सकाळी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिथे त्याच्या अनेक तपासण्या केल्या गेल्या. (Photo Credit: Manav Manglani)
फुफ्फुसांच्या कर्करोगाचा सामना करत असलेला अभिनेता संजय दत्त उपचारासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल झाला. संजय दत्तचा फुफ्फुसांच्या कँन्सर अॅडव्हान्स स्टेजमध्ये पोहोचला आहे. (Photo Credit: Manav Manglani)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -