PHOTO | 'या' बॉलिवूड स्टार्सचा आश्चर्यचकीत करणारा 'फॅट टू फिट' प्रवास
सोनाक्षी सिन्हा: बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या अगोदर सोनाक्षी सिन्हादेखील खूप लठ्ठ होती. स्वत: सोनाक्षीने सांगितले होते की जिमच्या पहिल्या दिवशी तिला ट्रेड मिलमध्ये 30 सेकंदांपेक्षा जास्त वेळ चालता येत नव्हते. हाच तो क्षण होता जेव्हा सोनाक्षी फिट राहण्याबाबत गांभिर्याने विचार केला होता. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सोनाक्षीने 30 किलो वजन घटवले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअर्जुन कपूर: बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वी अर्जुन कपूरचे वजन प्रचंड वाढले होते. तो खूप लठ्ठ झाला होता. मात्र कठोर मेहनत करुन अर्जुनने केवळ वजन कमी केले नाही तर आज तो तरुणांमधील फेमस आहे आणि सिक्स पॅक अॅबचा मालकही आहे.
फरदीन खान: 90 च्या दशकातील अभिनेता फरदीन खान अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला होता. दरम्यान फरदीनची काही छायाचित्रे व्हायरल झाली होती त्यात तो लठ्ठ झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत होतं. मात्र लठ्ठ झालेल्या फरदीनने पुन्हा फिटनेसकडे लक्ष देत पुन्हा फिट झाला आहे. त्याचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशी बातमी आहे की फरदीन लवकरच मोठ्या पडद्यावर परतणार आहे.
भूमी पेडणेकर: बॉडी ट्रान्सफॉर्मेशन काय असतं हे तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर भूमीचा 'दम लगर हैशा' हा चित्रपट नक्की पाहा. या चित्रपटासाठी भूमीने वजन वाढवले होते, परंतु चित्रपट पूर्ण होताच भूमीने असे आश्चर्यकारक रूपांतर केले की प्रेक्षक पाहातच राहिले होते.
अदनान सामीः 220 किलो वजन असलेल्या अदनान सामीनेही आपल्या शरीराच्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांनाच चकित केलं आहे. अदनानने सुमारे 155 किलो वजन कमी केले होते. त्यावेळी अदनानला बरेच लोक ओळखूही शकले नाहीत.
जेवणाक़डे योग्य लक्ष न दिल्यास वजन वाढणे ही समस्या अनेकांना आहे. मात्र पर्सनॅलिटीकडे लक्ष ठेवणारे बॉलिवूड स्टार्सही यामधे मागे नाहीत. असे अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत की ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर 'FAT to FIT' असा प्रवास केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -