PHOTO |'... मगर ये देश रहना चाहिए' या विचाराचे राजकारणातले अजातशत्रू, अटल बिहारी वाजपेयी
भारताला जगात मानाचं स्थान प्राप्त करुन द्यायचं त्यांचं स्वप्न होतं. आपलं स्मितहास्य, सभ्यता, सुसंस्कृतपणा वाजपेयींनी कायम जपत या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी त्यांचीच एक कविता आठवते, मैं जी भर जिया, मैं मन से मरूं, लौटकर आऊंगा, कूच से क्यों डरूं?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोखरणची अणुचाचणी केल्यानंतर आपल्या देशावर आंतरराष्ट्रीय दबाब, निर्बंध येऊ शकतात हे माहित असूनही वाजपेयींनी पोखरणची अणुचाचणी केली. देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याच्या आपल्या विचारांवर ते 'अटल' राहिले.
पोखरण अणुचाचणीचे हिरो डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना वाजपेयींनी एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले आणि देशाला खऱ्या अर्थानं चांगला राष्ट्रपती दिला.
वाजपेयी आपल्या हिंदी भाषेवरच्या प्रेमासाठी प्रसिध्द होते. त्यांनी जनता सरकारच्या काळात परराष्ट्र मंत्री म्हणून काम करताना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेत हिंदीतून भाषण केलं होतं.
त्यांनी ‘आज़ादी’ या विषयावर आपल्या वेगळ्या अंदाजात भाष्य केलं होतं. ‘इसे मिटाने की साज़िश करने वालों से कह दो कि चिंगारी का खेल बुरा होता है; औरों के घर आग लगाने का जो सपना, वो अपने ही घर में सदा खड़ा होता है.’
वाजपेयी नेहमी धोतर आणि कुर्ता असा वेश करायचे. त्यांना कविता करायची जशी आवड होती तशी वेगवेगळ्या खाण्याच्या पदार्थांचे ते शौकीन होते.
आपल्या हास्य-विनोदासाठी प्रसिध्द असणाऱ्या वाजपेयींनी एकदा सांगितलं होतं की राजकारण सोडायची माझी इच्छा आहे, पण राजकारण मला सोडत नाही.
1996 साली आपल्या विश्वासदर्शक ठरावावेळी त्यांनी केलेलं संसदेतील भाषण प्रचंड गाजलं. ते म्हणाले होते की, ‘सत्ता का तो खेल चलेगा, सरकारें आएंगी-जाएंगी, पार्टियां बनेंगी-बिगड़ेंगी, मगर यह देश रहना चाहिए, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिए.’
वाजपेयी हे राजकारणातील अजातशत्रू म्हणून ओळखले जायचे. त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास त्यांच्या भाषणातून वारंवार प्रकट व्हायचा.
वाजपेयींचे योगदान लक्षात घेऊन त्यांना मार्च 2015 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारत रत्न' देण्यात आला आहे.
सत्तेच्या राजकारणात 13 मे 1999 साली त्यांचं सरकार केवळ एका मतानं पडलं होतं. समोर आलेल्या संकटाला हार न मानता तोंड द्यायचा त्यांचा स्वभाव होता. त्यांची एक कविता प्रसिध्द आहे, हार नहीं मानूंगा, रार नई ठानूंगा, काल के कपाल पे लिखता मिटाता हूं, गीत नया गाता हूं.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 साली मध्यप्रदेशत्या ग्वाल्हेरमध्ये झाला होता. नऊ वेळा लोकसभा आणि दोन वेळा राज्यसभा सदस्य आणि तीन वेळा पंतप्रधानपद अशी त्यांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्द होती
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -