Yavatmal : साडेनऊ लाखांच्या देशी-विदेशी दारूवर रोड रोलर, शिरपूर पोलिसांची कारवाई!
यवतमाळच्या वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्यातील दारूबंदीच्या 178 गुन्ह्यातील देशी-विदेशी अश्या 16 हजार 440 दारूच्या बाटल्या म्हणजेच नऊ लाख 60 हजार रुपयांच्या दारूवर रोड रोलर फिरवण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही दारू न्यायालयाच्या आदेशाने नष्ट करण्यात आली. वणी तालुक्याचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, यांनी उत्पादन शुल्क विभाग यांच्या समक्ष नष्ट करणे बाबत परवानगी दिली होती.
शिरपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन करेवाड यांनी पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचे सोबत पत्र व्यवहार केला होता.
त्यात सदर गुन्ह्यातील दारू नष्ट करून रिकाम्या बाटल्यांचा लिलाव करावी व रोख रक्कम चलनाद्वारे राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या सरकारी खात्यात जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
शिरपूर पोलिसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व दोन पंच यांचे समक्ष रीतसर पंचनामा करून
178 गुन्ह्यातील एकूण 16 हजार 440 देशी-विदेशी दारूच्या काचेच्या बॉटल मधील दारू खड्डयात ओतून नष्ट केली
तर उरलेल्या रिकाम्या प्लास्टिक च्या बाटल्यांचा लिलाव करण्यात आला
व्यसनामुळे राज्यात अनेक संसार उद्ध्वस्त होण्याच्या घटना घडताना दिसतात.
अश्यातच पोलिसांनी उचललेल्या पावलाचे सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे