Yavatmal Crime News: यवतमाळमध्ये अवैध वाळूची तस्करी; कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर माफियाचा हल्ला, API ने थेट हल्लेखोरांवर केला गोळीबार

Yavatmal Crime News: वाळू तस्करांनी पोलिसांवर थेट हल्ला केला, एपीआयच्या फायरिंगमध्ये एक आरोपी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबाराच्या घटनेनं वाकोडी परिसर हादरला.

Continues below advertisement

Yavatmal Crime News

Continues below advertisement
1/7
यवतमाळच्या महागांव वाकोडी परिसरात फायरिंग झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांवर वाळू माफियांने हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर एपीआयने स्वसंरक्षणार्थ फायरिंग केली.
2/7
वाळू तस्करांनी पोलिसांवर थेट हल्ला केला, एपीआयच्या फायरिंगमध्ये एक आरोपी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबाराच्या घटनेनं वाकोडी परिसर हादरला.
3/7
image 5
4/7
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात दाखल झाले आहेत. कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरतीच वाळू माफियांनी हल्ल्याचा प्रयत्न केला, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंबुरे यांना मारहाण करण्यात आली आहे.
5/7
स्वतःचा बचाव करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबुरे यांनी दोन राऊंड फायर केले, त्यात एक जण जखमी झाला आहे.
Continues below advertisement
6/7
चार आरोपी फरार आहेत, पोलिस अधिकाऱ्यांच्या फायरिंगमध्ये एक गोळी आरोपी गुलाब खाजा शेख यांच्या हाताला लागून तो जखमी झाला आहे.
7/7
एपीआय सुनील अंभोरे पुसदच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. उमरखेड महागाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
Sponsored Links by Taboola