मेळघाट दौऱ्यावर असलेल्या नवनीत राणांची बैलगाडी सवारी, पाहा फोटो
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ह्या नेहमी कोणत्यान कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत राहत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकधी महिलांसोबत दौड स्पर्धेत धावणे, कधी हॉटेलमध्ये जाऊन जिलेबी बनविणे तर कधी लहान मुलांसोबत क्रिकेट खेळणं..
आज तर नवनीत राणा यांनी चक्क बैलगाडीची सवारी केली. इतकंच नाहीतर बैलगाडी सुद्धा चालवली.
आज खासदार नवनीत राणा ह्या मेळघाटच्या दौऱ्यावर होत्या तेव्हा त्यांनी बैलगाडीतील प्रवासाचा आनंद लुटला..
खासदार नवनीत राणानी केली मेळघाटात बैलगाडी सवारी
आज खासदार नवनीत राणा ह्या मेळघाटच्या दौऱ्यावर असतांना एक कुटुंब बैलगाडीने प्रवास करत होता यावेळी नवनीत राणा यांनी त्यांची बैलगाडी चालवून बैलगाडी सवरीचा आनंद लुटला..
मेळघाटच्या धारनी तालुक्यातील टिटंबा गावा माधे मोती माता महायात्रा महोत्सव मध्ये खासदार नवनीत राना यांनी मोती मातेचे दर्शन घेउन समस्त गांवकार्यांशी संवाद साधला..
तसंच मेळघाटच्या टिटंबा गावकऱ्यांच्या वतीने आणि युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्त्यांनी खासदार नवनीत राना यांची लड्डूतुला सुद्धा केली..
नवनीत राणा यांच्या मेळघाट दौऱ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.