Masouleh village interesting facts : तुम्ही कधी ऐकले किंवा पाहलेत का घराच्या गच्चीवर रस्ते? जाणून घ्या कुठे आहेत अशी घरे
इराणमध्ये गिलान प्रांतात एक गाव आहे. मसुलेह असे या गावाचे नाव आहे. हे संपूर्ण गाव मातीच्या विटांनी बनलेले आहे. (Photo Credit : Pexels)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच हे गाव खूप सुंदर आणि आकर्षक दिसते. या गावातील रस्ते हे या गावाचे खास वैशिष्ट्य आहे.(Photo Credit : Pexels)
तुम्ही जगातील विचित्र घरे आणि विचित्र रस्ते पाहिले असतीलच. काही घरे मोठी असतील, काही घरे छोटी असतील, काही घरे वेगवेगळ्या आकाराची असतील. काही रस्ते वळणाची, वाकडी असतात. तर काही रस्ते खूप उंच असतात. काही खडबडीतही असतात. (Photo Credit : Pexels)
पण, जर आपण घरांबद्दल बोललो तर, लोकांना मुख्य रस्त्याच्या जवळ घर खरेदी करायचे असते. अनेकांची इच्छा असते की, त्यांचे घर मुख्य रस्त्याला लागून असावे. (Photo Credit : Pexels)
मुख्य रस्त्यालगत बांधलेल्या घरांच्या किमतीही बऱ्यापैकी महाग असतात. पण, अनेक लोक त्यांच्या सोइ नुसार रस्त्यालगत असलेली घरे खरेदी करतात. जगात असे एक शहर किंवा गाव आहे. जिथे घरासमोर रस्ता कमी पण घराच्या वर रास्ता तुम्हला पाहायला मिळेल. जाणून घ्या कुठे आहेत अशी घरे. (Photo Credit : Pexels)
इराण हा मध्य पूर्वेतील एक देश आहे. इराणचा इतिहास खूप जुना आहे. या मुस्लिम देशाची स्थिती आता आधीपेक्षा खूप चांगली आहे. इराणमधील एका अनोख्या गावाबद्दल जाणून घ्या. या गावरील रस्ते खूप खास आणि आकर्ष आहेत. (Photo Credit : Pexels)
इराणमध्ये गिलान प्रांतात एक गाव आहे. मसुलेह असे या गावाचे नाव आहे. हे संपूर्ण गाव मातीच्या विटांनी बनलेले आहे. हे गाव खूप सुंदर दिसते. या गावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे बांधलेले रस्ते.(Photo Credit : Pexels)
मसुलेहमध्ये बांधलेले रस्ते प्रत्यक्षात सामान्य रस्त्यांसारखे नाहीत. येथील रस्ते अतिशय खास पद्धतीने बांधण्यात आले आहेत (Photo Credit : Pexels)
आज पर्यंत तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल की घरांच्या गच्चीवर रस्ते असू शकतात. पण इराण मधील मसुलेह या गावातील घरांच्या गच्चीवर रस्ते आहेत. त्यामुळे ते असे दिसते की, एक घर दुसर्याच्या वर ठेवले आहे.हे गाव डोंगरावर वसलेले असल्याने या गावात अशा प्रकारचे रस्ते तयार करण्यात आले आहेत.(Photo Credit : Pexels)
मसुलेह गाव पर्यटनाच्या दृष्टिकोनातूनही खूप चांगले मानले जाते. या गावाचे नैसर्गिक सौंदर्य अतिशय आकर्षक आणि सुंदर आहे. या गावात इराणच्या जुन्या संस्कृतीची झलक पाहायला मिळते. डोंगरावर वसलेले हे गाव पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक या गावात येत असतात.(Photo Credit : Pexels)