Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Queen Elizabeth Coronation:असा झाला होता राणी एलिझाबेथ दोन हिचा राज्याभिषेक
एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी विंडसर तिचे वडील किंग जॉर्ज सहावा यांच्या आकस्मिक निधनानंतर फेब्रुवारी 1952 मध्ये एलिझाबेथ ब्रिटनची राणी बनली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएलिझाबेथ दोनच्या राज्याभिषेकाच्या समारंभाला 8,000 पाहुणे उपस्थित होते. याशिवाय 27 दशलक्ष लोकांनी हा सोहळा टीव्हीवर लाईव्ह पाहिला.
किंग जॉर्जच्या आकस्मिक निधनाने जगाला धक्का बसला होता. परंतु एलिझाबेथ तिच्या वडिलांच्या केवळ 16 वर्षांच्या कारकिर्दीनंतर सिंहासनावर बसेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती.
राणीचे आगमन भव्य होणार होते आणि प्रिन्स फिलिप यांच्या नेतृत्वाखालील राज्याभिषेक समितीने सुंदर सोनेरी घोडागाडीची व्यवस्था केली होती. .
सर नॉर्मन हार्टनेल यांनी राणीचा गाऊन बनवला होता.
राणी एलिझाबेथ दोनने तिच्या राज्याभिषेकाच्या दिवशी दोन सुंदर मुकुट घातले होते. सेंट एडवर्ड्स क्राउन आणि इम्पीरियल स्टेट क्राउन.
सेंट एडवर्ड्स क्राउन हा सर्व मुकुटांपैकी सर्वात महत्वाचा आणि पवित्र आहे. मुकुटाचे वजन अंदाजे 5 पौंड आहे आणि ते मौल्यवान रत्नांनी भरलेले आहे.
फ्रेंच शूमेकर रॉजर व्हिव्हियर आणि ब्रिटीश शूमेकर डेलमन लिमिटेड यांनी तयार केलेले राणीचे बूट होते. हे बूट फ्रान्सच्या चार्ट्रेस कॅथेड्रलपासून प्रेरित होते. बूटाला सोने आणि हिरे जडलेले होते.
एलिझाबेथ दोनने लाखो लोकांना भाषण दिले. ती भाषणादरम्यान म्हणाले की, माझ्यामागे केवळ गौरवशाली परंपरा आणि हजार वर्षांपेक्षा जास्त इतिहास नाही, तर राष्ट्रकुल आणि साम्राज्याची जिवंत शक्ती आणि वैभवही आहे.