डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण घरची सून जगप्रसिद्ध 'टायगर'सोबत अफेअरमध्ये अडकली! पोस्ट शेअर करत म्हणाला..
जगविख्यात गोल्फपटू टायगर वुड्स आणि डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअरची पहिली पत्नी व्हेनेसा ट्रम्प यांनी आपल्या नात्याविषयी एक कबुली दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या अनेक दिवसांपासून टायगर वुड्स आणि व्हेनेसा ट्रम्प यांचे अफेअर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
टायगर वुडस् आणि व्हेनेसा यांनी सोशल मीडियावरुन आपल्या नात्याची कबुली दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर हा अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मुलगा आहे. व्हेनेसा ही त्याची माजी पत्नी होती.
डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर आणि व्हेनेसा यांचा संसार लग्नाच्या 12 वर्षानंतर मोडला. या दोघांना एकूण पाच मुले आहेत.
व्हेनेसा ट्रम्प यांनी टायगर वुडस् यांच्यासोबत आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. हे दोघे सॅन डिएगोमध्ये एका गोल्फ स्पर्धेदरम्यान दिसले होते.
टायगर वुड्स यांनी व्हेनेसा ट्रम्पसोबतचे दोन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामधून या दोघांमधील जवळीक दिसून येत आहे.