अजब प्रेमाची गजब कहानी! मामीने नवऱ्याला सोडलं अन् भाचीसोबत केलं लग्न, मंदीराबाहेर बघ्यांची गर्दी

बिहारमधील गोपालगंजमध्ये एका मामीने भाचीसोबत लग्न केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भाचीच्या प्रेमापोटी पतीला सोडून तिने लग्नगाठी बांधली.

या लग्नाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
मामी आणि भाचीमध्ये तीन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरु होते. त्यामुळे दोघांनी कुटुंबियांचं न ऐकता दोघांनी मंदीरत लग्न केलं.
मंदिरात लग्नादरम्यान सर्व विधी पार पाडले. यावेळी लग्न बघण्यासाठी लोकांनी मंदीराबाहेर गर्दी देखील केली होती.
यावेळी दोघींनी एकमेकींना हार घातला, मंगळसूत्र घातले आणि मग सिंदूर लावून सात फेरे घेऊन सात जन्म सोबत राहण्याचे वचन दिले.
लग्नानंतर दोघांनीही एकमेकांसोबत शेवटपर्यंत राहण्याची शपथ घेतली.
भाची सुमन म्हणाली की, शोभा खूप सुंदर आहे.
तिचे दुसरीकडे लग्न झाले तर मला सोडून जाईल या भीतीपोटी आम्ही मंदिरात लग्न केले.
दोघींनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून लग्नाची माहिती कुटुंबीयांना दिली.
व्हिडीओमध्ये दोघींनीही त्यांच्या इच्छेनुसार लग्न करून एकत्र राहण्याबाबत सांगितलं आहे.
व्हिडीओमध्ये दोघंही बोलताना दिसत आहेत की, त्यांनी त्यांच्या मर्जीने लग्न केले आहे आणि सातजन्म एकत्र राहण्याबद्दल सांगितलं आहे.
मंदिरात लग्न करत असताना त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.