Maleesha Kharwa: 'स्लम प्रिंसेस'; धारावीच्या मलीशा खारवाची उत्तुंग भरारी
खरा हिरा केवळ सोनारच ओळखू शकतो, असं म्हटलं जातं. असाच एक हिरा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅन (Robert Hoffman) याने शोधून काढला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमलीशाच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.
2020 मध्ये जेव्हा हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमॅन हा मुंबईमध्ये आला होता. तेव्हा तो मलीशा खारवा ( Maleesha Kharwa) नावाच्या धारावीमध्ये राहणाऱ्या चिमुकलीला भेटला होता. मलीशा ही जेव्हा रॉबर्ट हॉफमॅनला भेटली तेव्हा रॉबर्टनं तिच्यासाठी 'गो फंड मी' नावाचे पेज सुरु करण्याचे ठरले. त्यानंतर मलीशा ही फेमस होण्यास सुरुवात झाली.
मलीशा ही सोशल मीडियावर जेव्हा फेमस झाली तेव्हा तिला दोन हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स देखील आल्या. तसेच तिनं लिव योर फेयरीटेल या शॉर्ट फिल्ममध्ये देखील काम केलं आहे. ही शॉर्ट फिल्म युट्यूबवर आहे.
14 वर्षाची मलीशा ही आता 'द युवती कलेक्शन' या ब्रँडचा चेहरा बनली आहे. या ब्रँडच्या प्रत्येक प्रोडक्टवर मलीशाचा फोटो आहे.
मलीशा ही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर देखील आहे. तिला इन्स्टाग्रामवर 235K फॉलोवर्स आहेत.
लीशा ही विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते. या पोस्ट शेअर करताना ती अनेकदा The Princess From The Slum या हॅशटॅगचा वापर करते. त्यामुळे ती 'स्लम प्रिंसेस'या नावानं देखील ओळखली जाते.
मलीशा ही तिच्या विविध फॉटोशूटचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करते. तिच्या मॉडेलिंग करिअरसाठी अनेक जण तिला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत.