IND vs PAK: भारत-पाक थरारापूर्वी प्रेक्षकांसाठी संगीत मेजवानी; पाहा फोटो
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात आज विश्वचषक 2023 चा महामुकाबला खेळवला जात आहे. अहमदाबादच्या (Ahmedabad) नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) हा सामना रंगत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवर्ल्ड कप 2023 चा उद्घाटन सोहळा पार पडला नव्हता, मात्र भारत-पाकिस्तान सामन्याची सुरुवात प्रशस्त संगीत कार्यक्रमाने झाली.
अहमदाबाद स्टेडिअमवर भारत पाकिस्तान सामन्याआधी संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यात भारताच्या नावाजलेल्या गायकांनी त्यांच्या सुरांची जादू दाखवली.
अरिजित सिंगच्या आवाजाने सारा आसमंत मंत्रमुग्ध झाला.
गायकांच्या रसील सुरांनी टीम इंडियाच्या चाहत्यांचा जोश चांगलाच बळावला.
अनेक पारंपरिक आणि देशभक्तिपर गाण्यांचंही सादरीकरण सामन्याआधी झालं.
सुखविंदर सिंह यांची गाणी क्रिकेट चाहत्यांनी एन्जॉय केली.
प्रख्यात गायक शंकर महादेवन यांनीही आपल्या गाण्यांचं सादरीकरण केलं आणि आसमंत फुलवला.
टीम इंडियाच्या चाहत्यांनी या सुरेल मैफिलाचा आनंद घेतला.
सर्वांच्या नजरा होत्या त्या म्हणजे सामन्यावर, टीम इंडियाने टॉस जिंकताच पुन्हा एकदा भारतीयांच्या आशा वाढल्या.
अहमदाबादचा नरेंद्र मोदी स्टेडियम निळ्या रंगात न्हाऊन निघाला. टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियमवर चाहत्यांची गर्दी उसळली.