अफलातून... डॉ. बाबासाहेबांची महाप्रतिमा, 3 क्विंटल तांदूळ, 30 जणांची टीम अन् 24 तास, ड्रोन शूट व्हायरल

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
छत्रपती संभाजीनगर येथे डॉ. बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा म्हणून भव्य असे 50 बाय 50 चे तांदळापासून रेखा चित्र तयार करण्यात आले आहे

तब्बल 3 क्विंटल तांदळापासून ही कलाकृती साकारण्यात आली असून लक्षवेधी ठरली आहे.
या अफलातून आणि लक्षवेधी कलाकृतीसाठी 30 मुलांची टीम 24 तास काम करत होती
छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात ही कलाकृती साकारण्यात आली आहे, याचा ड्रोन शूट व्ह्यूवजही व्हायरल झाला आहे
तांदळापासून तयार करण्यात आलेल्या बाबासाहेबांच्या रेखा चित्राला पाहण्यासाठी भीम अनुयायी गर्दी करत आहे.
बाबासाहेबांच्या या कलाकृतीचे विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून कैद करण्यात आले असून ही आदरांजली चर्चेत आहे