Washim News: बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीत भक्तांची मांदियाळी! संत सेवालाल महाराजांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न

बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवीत संत सेवालाल महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यासाठी देशभरातून हजारो बंजारा समाजबांधव पोहरादेवीत दाखल झाले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यभरातून बंजारा समाज बांधव संत सेवालाल महाराजांच्या पालख्या घेऊन पोहरादेवीत दाखल होत आहेत.

सेवालाल महाराजांच्या पालखीची नगर प्रदक्षिणा काढण्यात आली होती. तसेच संत संत सेवालाल महाराज मंदिरात मंत्री संजय राठोड आणि मंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह विधान परिषदचे आमदार बाबूसिंग महाराज आणि धर्मगुरू कबिरदास महाराज जितेंद्र महाराज आणि सुनील महाराज यांच्या उपस्थितीत पाळणा हलवून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि धार्मिक वातावरणात सोहळा संपन्न झाला.
पोहरादेवी परिसरात एका भक्ताने तीन किलोमीटरची आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. संत सेवालाल महाराजांचा आज (15 फेब्रुवारी रोजी) जन्मोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने संपूर्ण पोहरादेवी गाव आणि मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने सजवले आहे या रोषणाईत पोहरादेवी उजळून निघाला आहे. या सोहळ्याची भव्य दृश्ये ड्रोनच्या माध्यमातून abp माझाच्या प्रेक्षकांसाठी. ड्रोन सौजन्य -प्रफुल चव्हाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिमच्या बंजारा काशी पोहरादेवी इथं बंजारा विरासत नंगारा भवन वास्तूच लोकार्पण केलं. मात्र,या कार्यक्रमाला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचं कार्य करणारे आणि पोहरदेवीच्या विकासाला खऱ्या अर्थाने मदत करणारे सामाजिक लोकांचा सत्कार आज(15 फेब्रुवारी) वाशिमच्या पोहरादेवी इथं मंत्री संजय राठोड आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पार पडला.
बंजारा समाजाची काशी असलेल्या असलेल्या पोहरादेवी इथं संत सेवालाल महाराजांच्या 286व्या जयंती निमित्य 9 फेब्रुवारी पासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली होती. अशातच आज हा सोहळा संपन्न झाला आहे.
बंजारा समाजातील कला, साहित्य, राजकारण, उद्योग, अश्या विविध क्षेत्रातील नामवंत लोकांचा 2025 चा 'सेवा' पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुढच्या वर्षी पासून देशभरातील बंजारा समाजाच्या लोकांनी समाजासाठी विशेष कार्य करणार्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी भाषण दरम्यान सांगितलंय.