Photos: डोंबिवली हादरली, भीषण स्फोटानंतर 3 किमी परिसरात घर-दुकानाच्या काचा फुटल्या
डोंबिवली एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्याची दुर्घटना घडली आहे. कंपनीतील बॉयलरमध्ये सर्वप्रथम स्फोट झाल्यामुळे आगीसह धुराचे लोट संपूर्ण डोंबिवली परिसरात पसरले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभीषण स्फोटात 5 ते 6 कामगार जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, डोंबिवलीतल्या आजच्या स्फोटामुळे सहा वर्षांपूर्वीच्या प्रोबिस कंपनीतल्या स्फोटाच्या आठवणी जागा झाल्या आहे.
ओमेगा नावाच्या कंपनीत हा स्फोट झाला असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 6 ते 7 गाड्या दाखल झाल्या आहेत. मंत्री उदय सामंत हेही घटनास्थळी दाखल होत आहेत.
डोंबिवलीतील भीषण स्फोटामुळे 2 ते 3 किमी परिसरात मोठा हादरा बसला असून परिसरातील घरे व दुकानांच्या काच्या फुटल्या आहेत. सध्या भीषण स्फोटाचे व्हिडिओ व फोटो सोशल मीडियातून समोर येत आहेत
स्फोटानंतर बॉयलरचं भलं मोठं झाकण उडून दोन ते तीन किलोमीटर लांब डोंबिवली एमआयडीसी परिसरातील एका इमारतीत पडलं आहे, दूरवर उभ्या असलेल्या चारचाकी गाडीचेही नुकसान झालं आहे.
फुटाची तीव्रता एवढी होती की डोंबिवली एमआयडीसी भागात दीड ते दोन किलोमीटर लांब असलेल्या परिसरातील सोसायटी नावाच्या बिल्डिंग बाहेर एक कार उभी होती, त्या कारवर बॉयलरचा तुकडा जाऊन पडला आहे त्यामुळे कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय
डोंबिवली एमआयडीसी रहिवासी विभागातीलही अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहेत, तर, धुराचे लोट पाहून स्थानिकांनीही घटनास्थळी धाव घेतली होती.
स्फोटानंतर प्रशासनही घटनास्थळी धाव घेत असून मदत व बचावकार्य वेगाने सुरू आहे. मात्र, एमआयडीसीमधील या स्फोटाने डोंबिवलीकर हादरुन गेले आहेत.
आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत, अद्यापही आगी व धुराचे लोट दिसून येतात. सुदैवाने अद्याप जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, काही कामगार जखमी झाले आहेत.