Bhiwandi Fire : भिवंडीत आगीचं सत्र सुरुच, ऑइल गोडाऊनला भीषण आग
भिवंडी शहरातील खोका कंपाउंड परिसरात एका ऑइल गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. भिवंडीत अग्नितांडवाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
ही आग इतकी भीषण होती की परिसरात आगीचे लोट आणि धूर मोठ्या प्रमाणात पसरले होते.
तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अग्निशमन दलाचे जवानांकडून सुरू केले आहे.
दरम्यान, या आगीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे तर, सुदैवााने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोडाऊनमधील सामान जळून खाक झालं आहे.
खोका कंपाऊंड परिसरात अनेक भंगार गोडाऊन आणि कापडाचे कारखाने आहेत. त्यामुळे परिसरात इतर गोदामांना देखील आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत.
जानेवारी महिन्यात भिंवडी शहरात आग लागून 10 दुर्घटना घडल्या आहेत. येथे अनेक गोडाऊन असल्यामुळे आगीच्या घटना घडत असतात.