Best Smartphones : दमदार 6000mAh बॅटरी आणि 6 जीबी रॅम, 15 हजारहून कमी किमतीचे स्मार्टफोन्स
गेमिंगसाठी नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 15 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुमच्यासाठी मार्केटमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. गेमिंगसाठी मोबाईल वापरणाऱ्यांसाठी, स्मार्टफोनमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अधिक रॅम आणि पावरफुल बॅटरी. मोबाईलमध्ये या दोन्ही चांगल्या असल्यास आपण स्मार्टफोनमध्ये गेम सहजतेने खेळू शकतो. त्यामुळे अशा काही स्मार्टफोनची माहिती घेऊयात जे 6GB रॅम आणि 6000mAh बॅटरीसह येतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSamsung Galaxy F22 स्मार्टफोनमध्ये 6.4-इंच HD + सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 700x1600 पिक्सेल आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड One UI 3.1 वर काम करतो. हा स्मार्टफोन मीडियाटेक हेलियो जी 80 प्रोसेसरने सुसज्ज असू शकतो. मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने त्याचे स्टोरेज 1 टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. फोटोग्राफीसाठी, सॅमसंग गॅलेक्सी एफ 22 मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. सेकंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सलचा असून 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर 2 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड सेन्सर देण्यात आला आहे. पॉवरसाठी, फोनमध्ये 6000mAh ची मजबूत बॅटरी आहे, जी 25W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. या फोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत 14,499 रुपये आहे.
Tecno Pova 2 स्मार्टफोनमध्ये 6.9 इंच फुल HD + डिस्प्ले आहे. हा फोन Android 11 बेस्ड HiOS वर काम करेल. ऑक्टा-कोर Helio G85 एक ऑक्टा-कोर प्रोसेसर परफॉर्मन्ससाठी देण्यात आला आहे. फोनमध्ये 6 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेज आहे. Tecno Pova 2 स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय 2 एमपी मॅक्रो लेन्स, 2 एमपी डेप्थ सेन्सर यात देण्यात आला आहे. त्याचबरोबर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात 7,000mAh ची मजबूत बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. या फोनची किंमत 12,499 रुपये आहे.
POCO M3 स्मार्टफोनच्या फीचर्सविषयी सांगायचे तर यात 6.53-इंच FHD + डिस्प्ले आहे. ज्याचा स्टँडर्ड रीफ्रेश रेट 60Hz आहे. तुम्हाला फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर मिळेल. POCO M3 Android 10 बेस्ड MIUI 12 सह येतो. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Poco M3 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 48 एमपी प्रायमरी कॅमेरा, 2 एमपी डेप्थ आणि 2 एमपी मायक्रो लेन्स याशिवाय 8 एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, 4 जी LTE, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज फोनची किंमत 12,999 आहे.
Redmi 9 Power मध्ये 6.53-इंच फुल-एचडी + डॉट नॉच डिस्प्ले आहे. फोन अॅडव्हान्स MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये तुम्हाला ड्युअल नॅनो सिम पोर्ट मिळेल. या फोनमध्ये 6000mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात 48-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेन्सर, अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्ससह 8-मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर, 2-मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. त्याची किंमत 10,999 रुपये आहे.