Download Aadhaar Card : आता व्हॉट्सअॅपवरून डाऊनलोड होणार आधार आणि पॅन कार्ड; कसे ते पाहा
सध्याच्या काळात जवळपास प्रत्येकजण व्हॉट्सअपचा वापर करतो. व्हॉट्सअप हे असं एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. ज्याचे जगभरात अनेक यूजर्स आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय रेल्वेमध्ये खाण्यापासून ते ऑनलाईन तिकीट बुक करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी लोकांनी आता व्हॉट्सअॅप वापरण्यास सुरुवात केली आहे. व्हॉट्सअपचा अधिकाधिक वापर पाहता भारत सरकारनेही आता व्हॉट्सअॅपवर नागरिकांना काही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
आता सरकारी कागदपत्र डाऊनलोड करण्यासाठीही व्हॉट्सअॅपचा वापर करता येणार आहे. त्यानुसार तुम्ही तुमचे आधार कार्ड (Aadhar Card) आणि पॅन कार्ड (Pan Card) WhatsApp वरूनच डाऊनलोड करू शकता.
भारत सरकारचे ई-गव्हर्नन्स पोर्टल MyGov Helpdesk वरून तुम्ही अनेक प्रकारच्या सेवांचा लाभ घेऊ शकता. यामध्ये डिजीलॉकरच्या मदतीने पॅन आणि आधार देखील सहज डाऊनलोड करता येणार आहे. लोकांना डिजीलॉकरच्या विविध सेवा देण्यासाठी व्हॉट्सअॅपवर चॅटबॉटही सुरू करण्यात आला आहे.
सरकारच्या या व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे तुम्हाला तुमचे आधार कार्ड डाऊनलोड करायचे असल्यास, तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड संबंधित सर्व माहिती डिजीलॉकरवर (Digilocker) सेव्ह करावी लागेल.
यासाठी तुम्ही अँड्रॉइड किंवा iOS डिव्हाईसवर डिजिलॉकर अॅप डाउनलोड करून लॉग इन करू शकता. यानंतर, तुमचा नंबर वापरून, आधार आणि पॅन सेवा डिजीलॉकरशी लिंक करा.
WhatsApp द्वारे आधार कार्ड आणि पॅन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
त्यासाठी संबंधित क्रमांकावर तुम्हाला मेसेज करून डीजीलॉकर सर्व्हिस सुरु करायची आहे.
त्यानंतर संबंधित माहिती भरून तुम्हाला तुमच्या आधार आणि पॅन कार्डची PDF मिळेल.