Tanaji Sawant Son Rushiraj Sawant Missing: 68 लाख, चार्टर विमान, ते दोघं अन् सिक्रेट प्लॅन; तानाजी सावंत यांच्या मुलाचा जबाब नोंदवला, पाहा A टू Z स्टोरी!

माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचं काल (10 फेब्रुवारी) अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र काहीवेळेनंतर सह पुणे आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ऋषिराज सावंत यांचं अपहरण झालं नसून मित्रांसोबत तो बँकॉकला निघला होता, अशी माहिती समोर आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ऋषिराज सावंत बेपत्ता नाही, तो मित्रांसोबत आहे. पण तो नेमकं कुठे आहे याची माहिती नव्हती. ऋषिराज सावंत चार्टर फ्लाईटने बाहेर गेला असल्याची माहिती ड्रायव्हरने दिली असंही तानाजी सावंत यांनी सांगितलं.

तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. त्यावेळी तानाजी सावंत हे पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ऋषिराज सावंत याचे अपहरण झाले नसून तो मित्रांसोबत बाहेर गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तानाजी सावंत यांच्या मुलाचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. काल पुणे विमानतळावरच ऋषिराज सावंत याचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. मात्र या जबाबात नेमकं काय म्हटलंय, हे अद्याप समोर आलेलं नाहीय.
ऋषिराज सावंतसोबत कोण कोण खाजगी विमानानं पुण्याहून बँकॉकसाठी निघालेलं याची माहिती समोर आली आहे. ऋषिराज सावंतसोबत प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर हे दोन मित्र खाजगी विमानात होते.
नेमकं कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी अपहरणाची तक्रार दिली याचा तपास सुद्धा पोलीस करण्याची शक्यता आहे.
खरंच घरी न सांगता ऋषिराज सावंत बँकॉकच्या दिशेने निघाले होते का?, याबाबत पोलीस तपास करणार आहेत.
68 लाख रुपये देऊन एका खाजगी विमानाने ऋषिराज सावंत बँकॉकला निघाले होते. बँकॉकला जाण्यासाठी सोमवारी विमानाचे बुकिंग केले होते.
तानाजी सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी म्हटले की, ऋषिराज आणि माझ्यात कोणताही वाद झाला नाही. आम्ही रात्री गप्पा मारल्या.
प्रदोष असल्यामुळे पहाटे ऋषिराजने रुद्राभिषेक केला. त्यानंतर आम्ही आपापल्या कामाला गेलो. ऋषिराज आठ दिवसांपूर्वीच दुबईला गेला होता. मग तो अचानक पुन्हा बँकॉकला कसा केला, हा प्रश्न मला पडला होता.
दिवसातून आमचे अनेकदा फोनवर बोलणे होते. मग हा एअरपोर्टला अचानक का गेला, हे मला समजत नव्हते. त्यामुळे आम्ही 'वरी' (Worry) होतो. त्याच्यासोबत त्याचे मित्र होते. पण पप्पा रागवतील का, या भीतीने त्याने मला काही सांगितले नाही का, हे आता त्याच्या बोलल्यानंतर कळेल, असे तानाजी सावंत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.