Solapur News: शरद पवारांची कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नाला सप्त्नीक उपस्थिती

शरद पवार ( Sharad Pawar) हे खरेच अजब रसायन आहे याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याला पाहायला मिळाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कायम माणसात रमणारे पवार साहेब एका कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नासाठी थेट हेलिकॉप्टर घेऊन मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावात पोहचले आणि तेही सपत्नीक...

मंगळवेढा तालुक्यातील लतिफ तांबोळी यांच्या मुलीचा विवाह मरावडे या ठिकाणी आयोजित केला होता .
लतिफ हे पहिल्यापासून पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून सोलापूर जिल्ह्याला परिचित आहेत .
आपली कन्या हिना हिच्या विवाहाची पत्रिका काही दिवसापूर्वी लतिफ यांनी पवार यांना देऊन लग्नाला येण्याची विनंती केली होती.
लतिफ यांनी पवार यांचा कार्यक्रम पाहून शनिवारी विवाह मुहूर्त धरला होता. मुस्लिम समाजात शुक्रवार अर्थात जुम्मा आणि अकराची वेळ शुभ मानतात.
मात्र आपल्या साहेबांना शनिवारी दुपारी तीन वाजता वेळ आहे हे पाहून रूढी परंपरा मोडत शनिवारी दुपारी तीन वाजता विवाह ठेवला.
समाज बांधव , ग्रामस्थ यांनी यामुळे लतिफ भाई यांची टिंगल देखील केली . मात्र लतिफ भाई यांचा आपल्या साहेबांवर अपर श्रद्धा असल्याने साहेब विवाहाला येणार हा विश्वास होता.