Solapur Art Exhibition : सोलापुरात अभिनव कला महोत्सव, महोत्सवाने घातली कलाप्रेमींनी भुरळ....

सोलापुरात आर्टिस्ट अभिनव सहकारी संस्थेच्या माध्यमातून 'अभिनव कला महोत्सवाचे' आयोजन करण्यात आलेले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या महोत्सवामध्ये 30 चित्रकार आणि शिल्पकारांनी आपले कलाविष्कार सादर केलेत.

'अभिनव कला महोत्सवा' हा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग मानला जातोय.
माजी सहकार मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते या अभिनव कला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
दरम्यान सोलापूरनंतर वेगवेगळ्या शहरात आणि राज्यात देखील अशा प्रकारचे चित्रशिल्प प्रदर्शन आयोजित करावे, असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले आहे
सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
आज 29 जानेवारीपर्यंत हे नागरिकांना पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी खुले असणार आहे.
आज महोत्सवाचा शेवटचा दिवस असून कलाप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे
चित्रकार आणि शिल्पकारांना एक व्यासपीठ यानिमित्ताने सोलापुरात मिळाल्याने आनंदाचे वातावरण पाहायला मिळालं
सोलापूर परिसरातून या महोत्सवास प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळत आहे
दोन दिवस असलेल्या या महोत्सवाचा आज शेवटचा दिवस आहे
हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगण कलाप्रेमींनी फुलून गेलेलं आहे