सांगोला तालुक्यात चक्क चार फूट लांब बाजरीच्या कणसाची चर्चा; गावठी बियाण्याची कमाल!
शेतकरी वर्ग पारंपरिक पिकाकडे पाठ फिरवून नगदी पिकांकडे वळला असताना, आता पारंपरिक पिकांतही नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोळा येथील शेतकरी राहुल वाले यांनी लावलेल्या बाजरीला तीन ते चार फुटांपर्यंत कणीस लागल्याने ते पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
वाले यांनी राजस्थानहून पोस्टाने एक हजार रुपये किलो दराने गावठी बियाणे आणून त्यांची आपल्या शेतात पेरणी केली होती.
यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने पीक चांगले जोमात आले. बहरलेल्या बाजरीला तब्बल तीन ते चार फुटांपर्यंत कणीस लागल्याने पाहणारे परिसरातील शेतकरी गर्दी करू लागले आहेत
राहुल वाले यांनी 20 गुंठ्यात ही बाजरीचे पीक घेतलअसून, त्यातून उत्पन्न देखील चांगले निघणार आहे.
नियमित करण्यात येणाऱ्या बाजरी पिकापेक्षा तिपटीने जास्त उत्पादन हे तुर्की जातीचे बाजरी पीक देते, असा दावाही वाले यांनी केला आहे.
बाजरी बियाण्यांची जात तुर्की असून, कणसाची लांबी चार ते पाच फूट आहे. 20 गुंठ्यात अर्धा किलो बियाणे लागले आहेत. विशेष म्हणजे, यासाठी मोजकीच खते वापरली आहेत.
आपल्या भागातील बाजरी व तुर्की जात असलेल्या बाजरीमध्ये फरक असल्याचा दावा वाले यांनी केला आहे.
तुर्की जात असलेल्या बाजरीमध्ये उष्णता कमी प्रमाणात असल्यामुळे ही बाजरी मूळव्याध व शुगर असलेले नागरिकना फायदेशीर ठरू शकेल असा दावा वाले करतात.