ललित पंचमीला रुक्मिणी माता वनदेवीच्या पोशाखात तर विठुराया नखशिखांत सोन्याने नटला, पाहा फोटो
शारदीय नवरात्र महोत्सवात विठ्ठल मंदिरात पाचव्या माळेला रुक्मिणी मातेची वनदेवीच्या पोशाखात पूजा बांधण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर पंढरीचा विठुराया देखील निखशिखांत सोन्याच्या अप्रतिम दागिन्यांनी नटला होता.
ललित पंचमी असल्यामुळे रुक्मिणी मातेला वनदेवी बनविताना रुक्मिणी मातेची साडी आणि इतर संपूर्ण पोशाख हा फुलांनी तयार करण्यात आला होता.
रुक्मिणीमातेच्या तिचे दागिने देखील फुलांनी तयार करण्यात आले होते.
रुक्मिणी मातेच्या सभोवताली वनाचे स्वरूप देण्यात आल्याने रुक्मिणी मातेचा गाभारा देखील फुलांनी सजवण्यात आला होता.
या फुलांच्या वस्त्रावर रुक्मिणी मातेला मोत्यांचे मंगळसूत्र , चिंचपेटी , तानवड जोड , मोत्याचा कंठ रूळ जोड , तोडे आणि मोठी नथ असे ठेवणीतील आभूषण परिधान करण्यात आली होती.
तर विठुरायाच्या मस्तकी लाल रंगाची पगडी , मखमली जांभळ्या रंगाच्या अंगी आणि भरजरी पितांबर असा पोशाख करण्यात आला होता.
यावर अत्यंत मौल्यवान असे 12 प्रकारचे ठेवणीतले दागिने घालण्यात आले होते.
यामध्ये गळ्यात कौस्तुभ मणी , कानाला हिरेजडित मत्स्य , दंडाला हिरेजडित दंडपेट्या , डोक्यावरील पगडीला मोत्याचा तुरा , तोडे , मोहरांची माळ , सोन्याचा गोफ , पुतळ्यांची माळ , लक्ष्मी हार , मारवाडी पेठ्याचा सोन्याचा करदोडा , मोर मंडळी असे पुरातन अलंकार विठुरायाला घालण्यात आले होते.
विठ्ठल रुक्मिणीचे हे साजरे स्वरुप पाहण्यासाठी भाविकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं पाहायला मिळालं.