PHOTO: घुगे दाम्पत्य ठरलं मानाचे वारकरी, पंधरा वर्षापासून नियमितपणे वारी
महापूजेच्या वेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड करण्यात आलेली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील माळेदुमाला येथील शेतकरी बबन विठोबा घुगे आणि वत्सला बबन घुगे या दांपत्याची मानाचे वारकरी म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
हे शेतकरी दाम्पत्य मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे वारी करत असून, त्यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली आहे.
दरम्यान यावेळी घुगे दाम्पत्याला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आला.
प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, मानाचे वारकरी व उपस्थित सर्व मान्यवर यांचा सत्कार करण्यात आला.
तर, आम्हाला उपमुख्यमंत्री यांच्यासोबत महापूजा करण्याची संधी मिळेल असे कधीच वाटले नव्हते. मात्र, आज जी काही संधी मिळाली आहे ती विठ्ठलाची कृपा असल्याचे मनाचे वारकरी बबन घुगे म्हणाले.
आमच्या तर मनात देखील नव्हतं की आपल्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होईल, पण परमेश्वराने ते घडवून आणले असल्याचं, वत्सला बबन घुगे म्हणाल्यात.
तर, श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढीला किमान 12 तास लागत होते. तर योग्य नियोजन करून कार्तिकी यात्रेला हा कालावधी आठ ते नऊ तासापर्यंत आलेला असल्याचा दावा करण्यात आला आहे.