Sindhudurg Fort : भारतीय नौदल सिंधुदुर्ग किल्ल्यात उभारणार शिवरायांचा पुतळा उभारणार
छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि पराक्रमाची साक्ष देत गेली साडेतीनशे वर्षे ऐतिहासिक सिधुदुर्ग किल्ला अरबी समुद्रात डौलाने उभा आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App४ डिसेंबर ला भारतीय नौसेना दिन यावर्षी सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणार आहे.
यापूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभारण्याचा संकल्प भारतीय नौदलाने केला आहे.
भारतीय नौदलाने किल्ल्यात महाराजांचा पुतळा बसवण्याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती दिली आहे.
मात्र, पुतळा किल्यात कोणत्या ठिकाणी उभारला जाईल, त्याची भव्यता किती असेल, याबाबतची स्पष्टता स्थानिक प्रशासनाला दिलेली नाही. परंतु पुतळा लक्षवेधी असेल एवढे नक्की.
एवढा मोठा राष्ट्रीय कार्यक्रम किल्ल्यात होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे.
शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची दाट शक्यता आहे.