Samruddhi Mahamarg Accident : भीषण अपघात! समृद्धी महामार्गावर भरधाव कार ट्रकला धडकली; एक जण जागीच ठार

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉरवर डोणगाव जवळ हा भीषण अपघात झाला आहे.

Samruddhi Mahamarg Accident

1/8
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा एक भीषण अपघाताची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरिडॉरवर डोणगाव जवळ हा भीषण अपघात झाला आहे.
2/8
भरधाव वेगात जाणारी कार ट्रकला धडकल्याने कारचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार चालकाला डूलकी लागल्याने हा अपघात घडल्याचे समोर आलं आहे.
3/8
भूषण बळीराम मगर असे मृतक व्यक्तीचे नाव असून ते वाशिम जिल्ह्यातील मानका येथील रहिवासी आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या कारने समृद्धी महामार्गावरून वाशिमकडे जात असताना हा अपघात घडला आहे.
4/8
दरम्यान, अशीच एक अपघाताची घटना मुंबई-गोवा महामार्गावर घडली असून यात खाजगी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला आहे.
5/8
मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली असून या अपघातात 3 प्रवासी जखमी असल्याची माहिती आहे.
6/8
यात एक खासगी ट्रॅव्हल बस कोकणातून मुंबईच्या दिशेने जात होती. दरम्यान महाड शहराजवळ असलेल्या नडगाव जवळ हा अपघात घडला असल्याचे बोललं जात आहे.
7/8
अपघातातील जखमींना महाड येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.
8/8
अतिवेगात असताना खासगी ट्रॅव्हल बसची आयसर टेम्पोला मागून जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला असून या अपघातात बसचे मोठे नुकसान झाल्याचे बघायला मिळते आहे.
Sponsored Links by Taboola