भारतातल्या गुलाबांना परदेशातून मागणी वाढली, 40 कोटींच्या घरात उलाढाल पोहचण्याचा अंदाज

रशिया-युक्रेनच्या युध्दामुळं (Russia Ukraine War) भल्याभल्यांचं कंबरडं मोडलेलं असताना भारतातील गुलाब उत्पादक शेतकरी मात्र मालामाल होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रशिया-युक्रेनच्या युध्दामुळं (Russia Ukraine War) भल्याभल्यांचं कंबरडं मोडलेलं असताना भारतातील गुलाब उत्पादक शेतकरी मात्र मालामाल होणार आहे.

रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळं (Russia Ukraine War) महागाईचा भडका (Inflation) उडाला. भारतातील भल्याभल्यांचं तर कंबरडं मोडलंच, सोबतच प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आजही याची झळ सोसावी लागत आहे. पण रशिया-युक्रेनच्या युध्दामुळं पुण्याच्या मावळमधील मुकुंद ठाकरेंना कमालीचा फायदा झाला आहे.

भारतात मोठ्या प्रमाणात गुलाब उत्पादन हे अशा पद्धतीने पॉलिहाऊसमध्ये (Pollyhouse) घेतलं जाते. तसं युरोपियन देशात हेच गुलाब उत्पादन ग्लासहाऊसमध्ये (GlassHouse) घेतलं जातं. कारण तिथं मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी (Snow Fall) होते.
बर्फवृष्टी झाली की तिथलं वातावरण बिघडते. या वातावरणाचा समतोल राखण्यासाठी जनरेटरचा वापर केला जातो. परंतु रशिया युक्रेनच्या युध्दामुळं तेलाच्या किंमती गगनाला भिडल्यात. त्यामुळं गुलाब उत्पादनाचा खर्च आवाक्याबाहेर गेला.
परिणामी यंदा युरोपियन देशातील शेतकऱ्यांनी गुलाब उत्पादन घेतलेलं नाही. त्यामुळंच भारताच्या गुलाबाला मोठी मागणी वाढली आहे.
मावळ तालुक्यातील सव्वा दोनशे हेक्टर क्षेत्रावर गुलाब फुल बहरतो. म्हणूनच देशातील गुलाब फुलाच्या उत्पादनात मावळ तालुक्याचा पन्नास टक्के वाटा असतो.
भारतातील जवळपास बाराशे एकर क्षेत्रावरील गुलाब उत्पादनातून गेल्या वर्षी फक्त व्हॅलेंटाईन-डेसाठी (Valentine Day) 21 कोटींची निर्यात झाली होती. पण यंदा वाढलेली मागणी पाहता यंदाच्या व्हॅलेंटाईन-डे वेळी तब्बल 40 कोटींच्या निर्यातीचा अंदाज आहे.
युरोपियन देशाला गुलाब फुलांचं आगार म्हटलं जातं. पण रशिया-युक्रेन युद्ध अन् त्यामुळं महागलेल्या तेलांमुळं तिथलं यंदाचं गुलाब उत्पादन थांबलं. यातूनच भारतीय गुलाब उत्पादकांना मिळालेल्या संधीचं ते सोनं करतायेत अन् मालामाल होत आहेत.