PHOTO: उठा उठा दिवाळी आली... बाजारपेठांत पुणेकरांची तुफान गर्दी!
दिवाळीचा (Diwali) सण दोन दिवसांवर येऊन ठेपला असून आकर्षक आकाशकंदील, पणत्या, रांगोळी साहित्याने बाजारात नवचैतन्य पसरले आहे.(फोटो सौजन्य : निवेदा फडणीस)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या आठवड्यापासूनच बाजारपेठांमध्ये पुणेकरांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.(फोटो सौजन्य : निवेदा फडणीस)
बाजारात विविध वस्तूंची रेलचेल पाहायला मिळतेय. बाजारात विविध सजावटीच्या वस्तू, दिवे, रांगोळी यांच्यासह रंगीबेरंगी आकाशकंदीलांनी देखील बाजारपेठा सजल्या आहेत.(फोटो सौजन्य : निवेदा फडणीस)
दिवाळीनिमित्त तुळशीबाग सजली असून बाजारपेठेत विविध प्रकारचे आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. (फोटो सौजन्य : निवेदा फडणीस)
पुणेकर खरेदीसाठी बाहेर पडत असून मुख्य बाजारपेठांमध्ये विविध दिवाळी साहित्य दाखल झाले आहे. पुण्याच्या तुळशीबागेत तसेच रविवार पेठेत प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य : निवेदा फडणीस)
यंदा पाऊसामुळे पुणेकरांच्या खरेदीवर बंधनं आली मात्र तरीही पाऊस नसेल त्यावेळी पुणेकर बाजारामध्ये गर्दी करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य : निवेदा फडणीस)
दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठांमध्ये आकाशकंदील, पणत्या, कलरफुल रांगोळ्या यासह विविध प्रकारच्या लाईट्स आणि दिव्यांच्या माळा सध्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहे.(फोटो सौजन्य : निवेदा फडणीस)
मेड इन चायना बरोबरच यंदा भारतीय बनावटीच्या लाईट माळांना पसंती मिळत आहे.(फोटो सौजन्य : निवेदा फडणीस)
दोन वर्षानंतर सर्व निर्बंध हटल्याने यंदा बाजारात तेजी दिसून येत आहे रोज नाही चा उत्सव असलेल्या सनानिमित्त विद्युत माळांच्या बाजारात गर्दी ओसंडून वाहत आहे.(फोटो सौजन्य : निवेदा फडणीस)
चायनामेड वस्तू बरोबर यंदा भारतीय बनावटीच्या वस्तूंना मोठी मागणी आहे. (फोटो सौजन्य : निवेदा फडणीस)
दीपोत्सवासाठी रंगबेरंगी कागदी, प्लास्टिक आणि कापडी आकाशकंदील बाजारात दाखल झाले असून दोन वर्षानंतर आकाशकंदील बाजाराला बहर आला आहे.(फोटो सौजन्य : निवेदा फडणीस)