Shivjayanti 2024 : 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' या जयघोषात किल्लेशिवनेरी दुमदुमली!
महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९४ वी जयंती आहे. (Photo credit : facebook/Devendra Fadnavis)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकिल्ले शिवनेरीवर आज शिवजन्माचा सोहळा संपन्न झाला. यानिमित्ताने राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. (Photo credit : facebook/Devendra Fadnavis)
या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील आदी नेतेमंडळी उपस्थित होती. (Photo credit : facebook/Devendra Fadnavis)
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली. (Photo credit : facebook/Devendra Fadnavis)
मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या कार्यकुशलतेचे कौतुक करताना म्हटले की, छत्रपती शिवराय आई भवानीला कौल मागण्याइतके धार्मिक होते, तेवढेच व्यवहारी आणि विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी मायेने आपल्या प्रजेचा सांभाळ केला. (Photo credit : facebook/Devendra Fadnavis)
छत्रपती शिवरायांनी तलवार हाती घेतली पण ती कधी निष्पापांच्या रक्ताने माखून दिली नाही, त्यामुळे शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. (Photo credit : facebook/Devendra Fadnavis)
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात लढायला शिकवले. अन्याय करणारा कितीही मोठा असो देव देश आणि धर्मासाठी लढणारा जिंकतो. (Photo credit : facebook/Devendra Fadnavis)
आम्हीही शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करतोय. पुरातत्व विभागाच्या कामांच्या पद्धतीमुळेच गड किल्यांच्या विकासाला अडथळा येतो. मात्र, यामधे बदल करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Photo credit : facebook/Devendra Fadnavis)
अजित पवार भाषणात म्हणाले की, शिवाजी महाराज म्हणजे सर्वांना एकत्र घेऊन जाणारा विचार. सर्व जाती, धर्मांना एकत्र करून गुलामगिरीच्या विरोधात लढले पाहिजे हे शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनावर बिंबवले. महायुती सरकार गड-किल्ल्यांसाठी काम करतेय. (Photo credit : facebook/Devendra Fadnavis)
गडासाठी 83 कोटी खर्च करण्यात आलेत. याबरोबरच इतर गडकिल्ल्यांच्या जिर्णोद्धार करण्याचे काम करण्याची सूचना मला मुख्यमंत्र्यांनी केलेय. या भागातील आदिवासी समाजाला हीरडा पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. (Photo credit : facebook/Devendra Fadnavis)