Pune News : जवानांच्या पोलादी मनगटांवर भारतमातेच्या जयघोषात बांधल्या राख्या

जवानांच्या पोलादी मनगटांवर भारतमातेच्या जयघोषात राख्या बांधल्या.

soldier

1/7
चाकावरच्या खुर्चीवरचे आयुष्य जगणारे ते सैनिक, देशभक्तीचा जोश मात्र कायमच जागवणारे...अशा जवानांच्या पोलादी मनगटांवर भारतमातेच्या जयघोषात भगिनींनी रेशीमराख्या बांधल्या.
2/7
खडकीच्या अपंग सैनिक पुनर्वसन केंद्रात हे भारलेले आणि राष्ट्रभक्तीने गुंफलेले वातावरण पहायला मिळाले.
3/7
सैनिक मित्र परिवाराच्या वतीने खडकी येथील पॅराप्लेजिक सेंटर येथे जवानांसोबत राखीपौर्णिमा साजरी करण्यात आली.
4/7
यावेळी कर्नल आर.के. मुखर्जी, कर्नल बी.एल. भार्गव आणि इतर अधिकारी तसेच स्वाती पंडीत, आरती भिसे, निकीता गुजराथी, सुरेखा होले, प्रितम गांधी, सिमरन गुजराथी, चंदूकाका सराफ पेढीच्या वैष्णवी ताम्हाणे, रुचिता गुप्ता उपस्थित होते.
5/7
यावेळी अनेक माजी सैनिक उपस्थित होते.
6/7
त्यांनी आयोजक आनंद सराफ आणि बाकी सगळ्या भगिनींचे आभार मानले.
7/7
यावेळी अनेकांचे डोळे पाणावलेले होते.
Sponsored Links by Taboola