Pune news : पुण्यात महिलांचं साडी रन; शेकडो महिलांचा समावेश
कौटुंबिक जीवनात महिलांना स्वत:करता वेळ मिळत नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रसंगी तिला शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते.
यातून तिला काहीसा मुक्त होण्याकरता पुण्यात तऩाएरा साडी रन आयोजन करण्यात आले होते.
स्वत:ची काळजी घेण्यासाठी आणि फिटनेवर लक्ष देण्यासाठी या रनचं आयोजन करण्यात आलं होतं.
या रनमध्ये पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील हजारो महिला सहभागी झाल्या होत्या विशेष म्हणजे सर्व महिलांनी साडी नेसून ही तीन किलोमीटरची रन केली.
यावेळी सर्व महिलांनी आकर्षक, विविध प्रकारच्या साडया परिधान केल्या होत्या तसेच सदन कमांड महिला ग्रुपही यात सहभागी झाला होता.
पुणे विद्यापीठाच्या मुख्य मैदानापासुन ही रन सुरु झाली विद्यापीठाच्या आवारात असलेल्या डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत या रनचा समारोप करण्यात आला.
अशा पद्धतीच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद या महिलेच्या चेह-यावर दिसून येत होता.