Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यातील हडपसर परिसरात आगीचा भडका उडाला असून येथील एका गोडाऊनमध्ये मोठी आग लागल्याची घटना घडली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशहरातील हडपसर, वैदुवाडी याठिकाणी एका भंगार मालाचे गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली
आगीच्या घटनेनंतर स्थानिकांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलास पाचारण केले, तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले
अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण मिळवले असून सद्यस्थितीत कुलिंग करण्याची कार्यवाही सुरू आहे.
सुदैवाने या दुर्घनेट कोणीही जखमी नाही, मात्र भंगार गोडाऊन मालकाचे मोठे नुकसान झाले आहे
आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडूनही घटनेची चौकशी केली जात आहे, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली की इतर कारण याचा शोध घेतला जात आहे.
आगीने रौद्र रुप धारण केल्याने परिसरात धुराचे लोट पाहायला मिळाले, तर रात्रीच्या अंधारात आग भडकल्याचे पाहून नागरिकांना घटनास्थळी गर्दी केली होती.