Pimpari Success Story : वय 50 वर्ष... ऐन कोरोनाचा काळ, अडीच लाखांची नोकरी सोडून सुरु केला स्वत:चा व्यवसाय; आता कोट्यवधीची उलाढाल

Nursary Success Story : ऐन कोरोनाच्या काळात जिथे प्रत्येक जण आपली नोकरी वाचण्यासाठी धडपड करत होता, तिथे वयाच्या पन्नाशीत असलेल्या भाऊसाहेब नवले यांनी लाखोंची नोकरी सोडून काही वेगळं करण्यातचं ठरवलं.

Pimpari Nursery Success Story Of Bhausaheb Navale

1/11
वयाची पन्नाशी आणि कोरोनाचा पडता काळ... मात्र, या काळातही पिंपरीच्या भाऊसाहेब नवले यांनी स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचं नक्की केलं.
2/11
ही तशी रिस्कचं होती कारण, कोरोनाकाळात जिथे अनेकांचे पगारल रखडले आणि नोकरी गमावली तिथे भाऊसाहेबांनी अडीच लाख पगाराची नोकरी सोडून व्यवसाय करण्याचं ठरवलं.
3/11
पण त्यांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं आणि आता ते व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल करत आहेत.
4/11
अडीच लाख रुपयांची नोकरी सोडलेले भाऊसाहेब आता वर्षाकाठी दोन कोटींची उलाढाल करत आहेत.
5/11
बीएससी ऍग्री झालेले भाऊसाहेब नवले (Pimpari Nursery Success Story) यांनी वयाच्या पन्नाशीत पुण्याच्या मावळमध्ये ग्रीन ऍण्ड ब्लुम्स नर्सरी सुरू केली.
6/11
भाऊसाहेब नवले यांनी 1995 ते 2020 अशी तब्बल 25 वर्षे नोकरी केली.
7/11
त्यातील दहा वर्षे इथोपिया देशात पॉलिहाऊस मधील गुलाब उत्पादनाचा अनुभव घेतला, तिथून पुन्हा मायदेशात परतले अन इथं नर्सरीत नोकरी केली.
8/11
अडीच लाख पगार ही उत्तम होता, सर्व गरजा भागत होत्याच. पण वयाची पन्नाशी गाठली अन् भाऊसाहेबांनी ऐन कोरोनातच नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला.
9/11
जिथं लोक नोकरी टिकवण्यासाठी लढा देत होते तिथं भाऊसाहेबांनी मंदीमध्ये संधी शोधण्यासाठी इनडोअर पॉट-प्लांटस नर्सरीचा व्यवसाय सुरु केला.
10/11
भाऊसाहेब नवले आज वर्षाकाठी दोन कोटींची आर्थिक उलाढाल करतायेत, म्हणूनच कोरोना त्यांना पावलाच म्हणायचा. भाऊसाहेबांनी कोरोनामध्ये अर्ध्या एकरात सुरू केलेला व्यवसाय सध्या एक एकरात विस्तारलाय.
11/11
या नर्सरीत ते शंभर प्रकारच्या रोपांची लागवड करतात अन देशातील तब्बल तीनशे छोट्या-मोठया नर्सरी त्यांच्याकडून रोपं खरेदी करतात. यानिमित्ताने अनेकांना रोजगार ही उपलब्ध झालाय.
Sponsored Links by Taboola