Jejuri News : जेजुरीकर आक्रमक! जेजुरीत सरकार जाग आणण्यासाठी जागरण गोंधळ
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलल्याने जेजुरीकर आक्रमक झाले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेजुरीकरांनी धरणे आंदोलन सुरू केलं आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे.
सरकारला जाग आणण्यासाठी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलल्याने जेजुरीकर आक्रमक झाले आहेत.
सरकारला जाग आणण्यासाठी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
गुरुवारी जेजुरी ग्रामस्थांची ग्रामसभा झाली त्यात धरणे आंदोलन, साखळी उपोषण करण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला.
शुक्रवारी रोस्तरोको करत जेजुरी गडाच्या पायरी मार्गावर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. तसेच आज सरकारला जाग आणण्यासाठी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जेजुरीकरांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
तसेच 7 पैकी जेजुरीतील फक्त दोन जणांची विश्वस्त पदी नियुक्ती केल्याने जेजुरीकर धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेणार आहेत.
जोपर्यंत जेजुरी स्थानिकांची विश्वस्त पदी नेमणूक होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार असल्याचे गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.