Phoenix Mall Viman Nagar :फिनिक्स मॉलमध्ये आगीची घटना; अग्निशमन दलाकडून 6 वाहने रवाना
फिनिक्स मॉलमध्ये आगीची घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून 6 वाहने रवाना करण्यात आली आहे.
Pune Fire (Image Credit : Pune Reporter)
1/9
विमान नगर येथील फिनिक्स मॉलला दुपारी सव्वातीनच्या सुमारास भीषण आग लागली.
2/9
या आगीची माहिती अग्निशमन दलाला दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी देण्यात आली
3/9
त्यांनी तातडीने अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी रवाना केले.
4/9
मॉलच्या आवारातून दाट धूर निघत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले,.
5/9
त्यामुळे खरेदीदार आणि कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
6/9
आगीचे कारण आणि नुकसानीचे प्रमाण अद्याप समजू शकलेले नाही,
7/9
परंतु आपत्कालीन सेवा घटनास्थळी आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम करत आहेत.
8/9
आगीचे लोट परिसरात पसरत आहेत.
9/9
आगीमुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Published at : 19 Apr 2024 04:11 PM (IST)