In Pics : आगीची रात्र! नर्हे आंबेगाव परिसरातील भंगाराच्या गोडाऊनला आग
गॅसची पाईपलाईन फुटल्याच्या घटनेबरोबरच पुण्यातील नर्हे आंबेगाव परिसरातील एका भंगाराच्या गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या 10 गाड्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.
या भागात अनेक लहान लहान औद्योगिक कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या जवळ असलेल्या भंगाराच्या गोडाऊनला आग लागली आहे.
या आगीमधे दोन भंगार मालाचे गोडाऊन पुर्ण जळाले असून आतमधे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे साहित्य असल्याचे निदर्शनास आले. तसेच शेजारील दोन इमारतींचे ही काही प्रमाणात नुकसान झाले
आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण 10 अग्निशमन वाहने व काही खाजगी पाण्याचे टँकर आणि जेसीबीचा वापर केला गेला.
आतमधे कोणी अडकले नसल्याची खाञी करून पुढे सुमारे तासाभरात आग आटोक्यात आणत पहाटे आग पुर्ण विझवली.
तसेच शेजारीच असणाऱ्या दोन उंच इमारतीकडे आग कशी पसरणार नाही याची दक्षता घेत जवानांनी आपले कर्तव्य चोख बजावले.
एकाच रात्रीत पुण्यात दोन आगीच्या घटना घडल्या आहेत.