PHOTO : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती, पुरंदर किल्ल्यावर पाळणा जोजवला, मर्दानी खेळांचं आयोजन
पराक्रमी, शूर, धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशंभूरायांच्या 365 व्या जयंतीनिमित्त सकाळी दहा वाजता पुरंदर किल्ल्यावर महिलांनी पाळणा जोजवला.
पुरंदर किल्ला संभाजी महाराजांचे जन्मस्थान असल्याने इथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे.
ढोल-ताशांचा गजर, हलगीचा नाद, मर्दानी खेळ, मल्लखांब साजरे केले जात आहेत.
लहानपणापासून स्वराज्याचे बाळकडू मिळालेले संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्याची सूत्रे छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे आली
छत्रपती संभाजी महाराजांचे वर्णन इतिहासात शूर, पराक्रमी, स्वराज्यरक्षक आणि निधड्या छातीचा योद्धा अशी केली जाते.
16 जानेवारी इ.स. 1681 रोजी रायगड किल्यावर संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला.
ते एक कुशल संघटक होते. मराठ्यांच्या 15 पट असणाऱ्या मुघलांशी शंभूरायांनी एक हाती लढा दिली. त्यांनी सुमारे 120 युद्धे लढली. यापैकी एकाही लढाईत त्यांना अपयश आले नाही. त्यांनी 120 युद्धे जिंकली. यामुळे त्यांना अजिंक्य म्हटलं जातं.