Ajit Pawar : बारामती दौऱ्याला मराठ्यांचा विरोध; अजित पवारांच्या पुण्याच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घराबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात कऱण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या बारामती दौऱ्याला विरोध केला. त्यांनी आंदोलनाचा इशारादेखील दिला.
मराठा कार्यकर्त्यांचा हा रोष पाहता अजित पवारांनी बारामतीला जाणं टाळलं.
त्यानंतर त्यांनी थेट पुण्याचं घर गाठलं.
मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते कुठेही विरोध करायला येऊ शकतात. त्यामुळे अजित पवारांच्या पुण्याच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळतोय.
मराठा आरक्षण मिळत नसल्याने मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.
राज्यात विविध ठिकाणी ते पुढाऱ्यांना विरोध करण्यासाठी काळे झेंडे दाखवत असल्याचं समोर आलं आहे.
अजित पवारांना मराठ्यांनी घेराव घालू नये आणि अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे.