Sanjay Raut On Neelam Gorhe: निर्लज्ज, नमकहराम, भूत, बाई नव्हे बाईमाणूस, भ्रष्ट...; संजय राऊत नीलम गोऱ्हेंना काय काय म्हणाले?, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे!
Sanjay Raut On Neelam Gorhe: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केली आहे.
Sanjay Raut On Neelam Gorhe
1/10
ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी काल (23 फेब्रुवारी) केला होता. मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात नीलम गोऱ्हे यांनी हे विधान केलं.
2/10
नीलम गोऱ्हेंच्या या विधानावरुन कालपासून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे.
3/10
आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर हल्लाबोल केला.
4/10
नीलम गोऱ्हे यांचं विधान म्हणजे त्यांची विकृती...बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते कोणती बाई तुम्ही पक्षात आणली?, जाताना ही बाई ताटात घाण करून गेली, अशी टीका संजय राऊतांनी केली.
5/10
नीलम गोऱ्हे ही निर्लज्ज बाई आहे, नमक हराम बाई असं म्हणत हा शब्द कापू नका, बीप साउंड देऊ नका...हा असंवैधानिक शब्द नाही, असं संजय राऊत म्हणाले.
6/10
नीलम गोऱ्हे बाई नसून बाईमाणून आहे, भ्रष्ट आहे, अशी टीकाही संजय राऊतांनी केली.
7/10
काल नीलम गोऱ्हे म्हणाल्या 50 लाख रुपये दिले महामंडळाला... लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात?माझ्याकडे माहिती आहे पुरावे आहेत, असा दावाही संजय राऊतांनी यावेळी केला.
8/10
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील काल नीलम गोऱ्हेंच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.
9/10
नीलम गोऱ्हे यांनी मर्सिडीजबाबत केलेल्या विधानाबाबत विचारण्यात आले. यावर जाऊ द्या...मी त्याकडे लक्ष देत नाही.एक महिला म्हणून आदर आहे. त्यांनी राजकारणात त्यांनी त्यांचं चांगभलं केलं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. गद्दार सेनेत गेलेल्या लोकांवर मी बोलत नाही. त्यांच्या लेखी शिवसेना संपवली असे त्यांना वाटत असेल. पण माझी जुनी माणसे, निष्ठावान माणसे माझ्यासोबत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
10/10
नीलम गोऱ्हे नेमकं काय म्हणाल्या होत्या? कार्यकर्त्यांना कमी समजण्याचं कारण नाही. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी ठाण्यातून माणसं आणली जायची. गल्ला गोळा करण्याचं काम त्यांना (शिंदेंना) दिलं होतं. (उबाठांच्या शिवसेनेमध्ये) दोन मर्सिडीज दिल्या की पदं मिळायची, असा सनसनाटी आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या नेत्यांनाच आम्ही नको झालो होतो, असंही विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं. दरम्यान, मराठी साहित्य संमेलनात 'असे घडलो आम्ही' या कार्यक्रमात संपादक राजीव खांडेकर आणि पत्रकार प्रविण बर्दापूरकर यांनी नीलम गोऱ्हे यांची मुलाखत घेतली.
Published at : 24 Feb 2025 10:56 AM (IST)