PHOTO : तळपत्या सूर्याला इंद्रधनुष्याने वेढलं, परभणीकरांनी अनुभवला सुखद अनुभव
आज परभणीकरांनी एक सुखद अनुभव घेतला तो तळपत्या सूर्याला इंद्रधनुष्याने वेढल्याचा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुपारच्या वेळी आज सूर्याभोवती इंद्रधनुष्याचे गोल रिंगण तयार तयार झाले जे सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे होते.
या गोल रिंगण प्रक्रियेला मराठीत सूर्याभोवतीचे प्रभामंडळ असे म्हणतात.
तर वैज्ञानिक भाषेत या घटनेला सन हेलो (Sun Halo) म्हटलं जातं, जी एक सर्वसामान्य खगोलीय घटना आहे.
अतिशय मनमोहक असे हे दृश्यं पाहण्यासारखे असते.
परभणी शहरासह जिल्हाभरातून हे दृश्य आकाशात पाहायला मिळाले आहे.
आकाशात 20 हजार फुटांवर सिरस नावाचे ढग तयार होतात हे ढग तयार झाले की असे दृश्य दिसते.
या सिरस ढगांमध्ये बर्फाचे सूक्ष्म स्फटिक असतात ज्यातून सूर्याची किरणं विशिष्ट कोनातून गेल्यावर प्रकाशाचं अपवर्तन होतं आणि असे दृश्य तयार होते
साधारणतः चक्रीवादळानंतर असे ढग तयार होतात आणि अशाप्रकारे सूर्याभोवती इंदद्रधनुष्याचे प्रभामंडळ तयार होते ज्याला वैज्ञानिक भाषेत सन हलो असे म्हणतात.
परभणीकरांनी सूर्याच्या भोवती सात रंगांचं गोलाकार कडं पाहिलं आणि आपल्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद करुन सोशल मीडियात फोटो शेअर केले