Palghar : जव्हारच्या बोराळे गावात भीषण पाणीटंचाई, पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची पायपीट!
राज्यात उन्हाचा चटका वाढतोय, त्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढू लागली आहे. त्यातच पाण्याची पाणीपातळी घसरत आहे. बोअरवेल आणि विहिरीतील पाणी देखील कमी होत आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातच अनेक भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात अनेक भागात आत्तापासूनच पाणी टंचाई (Water Issue) जाणवत असल्याने गाव आणि वाड्यांवर टँकरद्वारे (Tanker) पाणीपुरवठा करावा लागतोय.
कुठे शासकीय तर कुठे खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. राज्यातील 70 गावं आणि 204 वाड्यांवर 75 टँकरद्वारे सद्या पाणीपुरवठा केला जात आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा आणि विक्रमगड तालुक्याला पावसाळ्यानंतर पाणीटंचाई ही पाचवीलाच पुजलेलीच आहे.
जव्हार मधील बोराळे गावाला सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय.
दोन हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या गावात सध्या विहिरींनी तळ गाठला आहे.
गावात असलेली नळपाणी योजनाही कुचकामी ठरली असल्याने येथील महिलांना पाण्यासाठी मैलोची पायपीट करावी लागते.
पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना एका खाजगी विहिरीचा आसरा घ्यावा लागत असून या विहिरीतील पाणीही हवं तेवढं मिळत नसल्याने गावातील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.
गावात पाणी टंचाई असताना देखील आजही या गावात टँकरने पाणीपुरवठा केला जात नाही आहे.
गावातील नागरिक आपली तहान भागवण्यासाठी पायपीट करत असले तरी गावातील जनावरांच्या चारा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.