Cyrus Mistry passed away : सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन
उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं रविवारी अपघाती निधन झालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालघर पोलिसांनी अपघाताची माहिती दिली आहे.
अपघात झाल्यानंतर सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 2013- 2016 यादरम्यान ते टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदी होते.
रविवारी दुपारी सव्वातीन वाजल्याच्या सुमारास अहमदाबातवरुन ते मुंबईला येत होते. त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती आहे.
मर्सिडिस गाडीतून ते प्रवास करत होते. डिव्हायडरला गाडी धडकल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.
या संदर्भात अधिकचा तपास पोलीस करत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
अपघात झाल्यानंतर यामध्ये जागीच दोघांचा मृत्यू झाला तर इतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
अपघात खूपच भीषण होता.
गाडीमध्ये टॉप क्लासचे सेफ्टी फिचर असतानाही अपघात दोन जणांचा मृत्यू झाला.
इतर दोन जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सूर्य नदीच्या चारोटी येथील ब्रिजवर टाटा समूहाच्या सायरस मिस्त्री यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. यामध्ये गाडीचा चक्काचूर झालाय...