ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारींना आज 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं गौरवण्यात येणार, अभूतपूर्व सोहळ्यासाठी अलोट गर्दी
श्रीमत् दासबोधाच्या निरुपणातून समाजात सकारात्मक बदल घडवणारे ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा भव्य सोहळा नवी मुंबईच्या खारघरमधील सेन्ट्रल पार्क मैदानावर पार पडणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी हजारो अनुयायी उपस्थित आहेत.
या पुरस्कार सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
या कार्यक्रमासाठी 20 लाखांहून अधिक श्रीसेवक उपस्थित असल्याचा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर आज रात्री 12 पर्यंत पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील अवजड वाहतूक बंद असणार आहे.
आजच्या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हार्बर रेल्वेमार्गावरील मेगाब्लॉकदेखील रदद् करण्यात आलाय.