PM Modi Navi Mumbai Visit : पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबईत विकास कामांचं लोकार्पण,भाषणातील ठळक मुद्दे
आज मोदी गॅरंटी ही देशातल्या घराघरात पोहचली आहे. जिथे दुसऱ्यांच्या आशा संपतात, तिथे मोदींची गॅरंटी सुरु होते, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअटल सेतू हा वांद्रे वरळी सी लिंकपेक्षा जास्तपटीने आधुनिक आहे. तेव्हाच्या सरकारला हा सेतू बनवण्यासाठी 10 वर्ष लागली होती. काहीच वर्षात हा अटल सेतू मुंबईकरांच्या सेवेत आलाय.
ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून देशावर राज्य केलं, त्यांची नियत चांगील नव्हती. त्यामुळे त्यांना देशात विकास करता आला नाही.
मागच्या 10 वर्षात भारत बदलला आहे याची चर्चा होत आहे. 10 वर्षांपूर्वी हजारो करोडच्या घोटाळ्याची चर्चा होत होती,आता प्रकल्पांची चर्चा होतेय. 2014च्या निवडणुकीआधी मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो त्यावेळी काही संकल्प मी केले होते.आज ते संकल्प पूर्ण होताना मी बघतोय.
मागील अनेक दिवसांपासून या अटल सेतूची चर्चा होतेय, आता या अटल सेतूची विशालता पाहून सर्वजण मंत्रमुग्ध झालेत. ही सागरी सेतू बनवण्यासाठी जपानने जे सहकार्य केलंय, त्यासाठी त्यांचे आभार
जी गॅरंटी मोदी सरकारने दिली तीच गॅरंटी महाराष्ट्र सरकार पुढे नेत आहे. आमच्यासाठी लोकार्पण, शिलान्यास हा एका दिवसाचा कार्यक्रम नसतो. आम्ही लोकांसाठी काम करतो, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
अटल सेतूच्या भूमिपूजनासाठी आलो तेव्हा मी छत्रपती शिवरायांना सांगितलं होतं, की देश बदलेलही आणि पुढेही जाईल, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून त्यांच्या भाषणाला सुरुवात केली आहे.पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दोन जुळ्या बहिणींना लेक लाडकी या योजनेअंतर्गत प्राथमिक स्वरुपातील धनादेश देण्यात आलाय.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लेक लाडकी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील आठ प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले आहे. यामध्ये ऑरेंज गेट ते नरिमन पॉईंट, नवी मुंबई मेट्रो, दीघा रेल्वे स्थानक या लोकार्पण कार्यक्रमांचा समावेश करण्यात आलाय.