PHOTO : वाशी मार्केटमध्ये हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल, दोन डझन आंब्यांचा दर...
नवी मुंबईतील वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातील देवगडचा हापूस आंबा दाखल झाला
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशीतील एपीएमसी मार्केटमधील प्रसिद्ध आंबा व्यापारी अशोक हांडे यांच्याकडे हा आंबा आला.
एपीएमसीमध्ये दाखल झालेली देवगड हापूस आंब्याची ही पहिलीच पेटी आहे.
देवगडमधील कातवण गावचे शेतकरी दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या शेतकऱ्यांनी पाठवला आहे.
आंबा मोसमाची आलेली पहिली पेटी अशोक हांडे यांच्याकडून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक चरणी अर्पण करण्यात येणार आहे.
या दोन डझनाच्या पेटीला नऊ हजार रुपयांचा दर मिळाला आहे.
आंब्याची विधिवत पूजा करुन संपूर्ण हंगाम चांगला जाऊ दे अशी प्रार्थनाही केली जाते.
कातवण गावातील आंबा बागायतदारांनी मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून दोन डझन आंब्याची पहिली पेटी कालच वाशी मार्केटला रवाना केली होती.
या वर्षी हापूस आंब्याचा मुख्य सीझन मार्चऐवजी एप्रिल महिन्यात सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.