Pandharinath Phadke : बैलगाडा शर्यत आणि बैलांची आवड असणाऱ्या, गोल्डमॅन पंढरीनाथ फडके यांचं निधन!
पनवेलच्या विहिघर येथील असलेल्या पंढरीनाथ फडके यांना बैलगाडा शर्यतीची मोठी आवड. महाराष्ट्रात कुठेही बैलगाडा शर्यत असेल तर त्या ठिकाणी ते हजर असायचे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच शर्यतीच्या 40 हून जास्त बैलं त्यांच्याकडे होती. सरकारने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्यानंतर ती परत सुरू करावी यासाठी पंढरीनाथ फडके यांनी प्रयत्न केले होते.
ज्या ठिकाणी बैलगाडा शर्यत असायची त्या ठिकाणी पंढरीनाथ फडके यांची एन्ट्री धमाकेदार व्हायची.
त्याच्या गळ्यात आणि अंगावर इतकं सोनं असायचं की कुणाचीही नजर त्यांच्याकडे जायची. त्यामुळे महाराष्ट्रातील गोल्डमॅन अशीही त्यांची ओळख होती.
शर्यतीत जिंकणाऱ्या बैलावर पंढरीनाथ फडके यांची नजर असायची. मग तो बैल कितीही किंमत लागली तरी ते विकत घ्यायचे.
11 लाख रुपये देऊन त्यांनी एक जिंकलेला बैल खरेदी केला होता. त्यावरून त्यांना बैलगाडा शर्यतीचा आणि बैलांची किती आवड होती हे लक्षात होतं.
कल्याण येथे गेल्या वर्षी राहुल पाटील आणि पंढरीनाथ फडके यांच्या वादातून भर रस्त्यात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणी पंढरीनाथ फडकेंना शिक्षा सुनावण्यात आली होती.