Maharashtra Bhushan Award: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची तयारी पूर्ण, वीस लाखांपेक्षा जास्त अनुयायी सोहळ्याला उपस्थित राहण्याचा अंदाज
नवी मुंबईच्या खारघर येथील सेंट्रल पार्कमध्ये उद्या होणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतब्बल वीस लाखांपेक्षा जास्त अनुयायी सोहळ्याला उपस्थित राहण्याचा अंदाज आहे.
या सोहळ्याच्या मुख्य स्टेजची निर्मिती देखील एखाद्या किल्ल्याप्रमाणे करण्यात येत आहे.
या मुख्य स्टेजवर सर्वांना बसायची अनुमती नसल्याने स्टेजच्या दोन्ही बाजूला व्हीआयपी आमंत्रितांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे
तर स्टेजसमोर भक्तांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
गर्दीचे नियोजन करण्यासाठी पासेसवर क्यू आर कोड देण्यात आले आहेत.
पाण्याची व्यवस्था म्हणून सिडकोने पाईप लाईन टाकून 12 नळ मैदानात दिले आहेत.
नऊ हजार स्वच्छतागृहांची सोय करण्यात आले आहे. तसेच 4200 मोबाईल टॉयलेटच्या मुंबई महापालिकेने दिले आहेत
आज रात्रीसाठी दीड लाख लोकांची जेवणाची व्यवस्था आहे.
12 काऊंटर ठेवण्यात आले आहेत. 900 लोक एकावेळी जेवण वाढतील अशी सोय करण्यात आली आहे.