Narendra Modi :पंतप्रधान मोदींकडून काळाराम मंदिरात पूजा आणि आरती!
काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात मुख्य दरवाजाने दाखल झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेवल्याच्या पैठणीचा शेला देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी सर्वप्रथम हनुमानाचे दर्शन घेतले.
त्यानंतर मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली.
त्यानंतर प्रधान संकल्प करण्यात आला. यावेळी रामरक्षा पठण देखील करण्यात आली.
मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी पंतप्रधान मोदींना पूजा सांगितली.
तसेच पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिरासमोरील स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला अभिवादन केले.
काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीत हे एक काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे.
गोपिकाबाई पेशवे यांच्या आदेशानुसार पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर १७७८-१७९० मध्ये बांधले.
येथे सीता व लक्ष्मण यांच्याही मूर्ती आहेत. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे.
मंदिरातील श्रीरामाची मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात.
दरम्यान, काळाराम मंदिराचे दर्शन उरकून नरेंद्र मोदी हे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहे.
यात 8 हजार युवकांनी सहभाग नोंदवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युवकांना काय मार्गदर्शन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरोहित संघाच्या वतीने चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी भारत विकसित राष्ट्र बनण्यासाठी संकल्प करण्यात आला. रामकुंड परिसराला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले.