PM Modi Kalaram Mandir Darshan : पंतप्रधान मोदींनीं केलं खणखणीत टाळ वाजवून भजन!
अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या नाशिक दौऱ्याला खास महत्त्व आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रभू श्रीराम 14 वर्षे वनवासात असताना त्यांनी नाशिकच्या पंचवटी येथे वास्तव्य केलं होतं.
जलपूजनानंतर पंतप्रधान काळाराम मंदिरात पोहोचले पुजा देखील केली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते युवा महोत्सवाचे उद्घाटन झालं . या महोत्सवात 8 हजार युवक सहभागी होते
पंतप्रधान मोदी यांचा नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत देखील केलं
नाशिकच्या भव्य रोड शोमध्ये पंतप्रधान मोदींवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
पंतप्रधान मोदींनीं केलं काळाराम मंदिरात खणखणीत टाळ वाजवून भजन देखील केले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरोहित संघाच्या वतीने चांदीचा कुंभ आणि पगडी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भारत विकसित राष्ट्र बनण्यासाठी संकल्प करण्यात आला. रामकुंड परिसराला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले.
काळाराम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरात मुख्य दरवाजाने दाखल झाले. येवल्याच्या पैठणीचा शेला देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी सर्वप्रथम हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर मोदींच्या हस्ते प्रभू श्रीरामाची विधिवत पूजा आणि महाआरती करण्यात आली.
त्यानंतर प्रधान संकल्प करण्यात आला. यावेळी रामरक्षा पठण देखील करण्यात आली. मंदिराचे मुख्य पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी पंतप्रधान मोदींना पूजा सांगितली.