Cabbage Price : दर नसल्यानं शेतकऱ्यानं कोबीवर फिरवला रोटावेटर
कोबीला (Cabbage) चांगला बाजारभाव (Market Price) मिळत नसल्यामुळं पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंदापूर (Indapur) तालुक्यातील तक्रारवाडी येथील सुनील काळंगे (Sunil Kalange) या शेतकऱ्याने आपल्या 10 गुंठे कोबी पिकावर रोटावेटर फिरवला आहे. यामुळं त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
एका बाजूला शेतकऱ्यांचा (Farmers) उत्पादन खर्च वाढला असताना दुसरीकडं शेतमालाला चांगला दर मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
शेतमालाला योग्य दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. पिकाला केलेला खर्चही निघणे कठीण झालं आहे.
सध्या कोबीच्या एका फुलाला किरकोळ बाजारात अगदी तीन ते पाच रुपये असा बाजारभाव मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा मजुरी खर्च देखील निघत नाही, अशी अवस्था झाली आहे.
सध्या कोबीला योग्य बाजारभाव नसल्यामुळं पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली असल्याचे शेतकरी सुनील काळंगे यांनी सांगितले
शेतकऱ्यांना सातत्यानं विवध संकटाचा सामना करावा लागतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येत आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. सध्या बाजारात शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही.
बाजारभाव नसल्यामुळं कोबी काढून टाकण्याची वेळ आल्याचे सुनील काळंगे यांनी सांगितले.
10 हजार रोपांसाठी 10 हजार रुपयांचा खर्च आला. तसेच खुरपणीसाठी चार हजार तर खतांसाठी पाच हजार रुपये तसेच इतर औषधांसाठी पाच हजार रुपयांचा खर्च आला आहे. 10 गुंठे कोबीसाठी एकूण 25 हजार रुपयांचा खर्च आला असून, हातात काही उत्पन्न आलं नसल्याचे काळंगे यांनी सांगितले.